रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश अन्नधान्य आणि खाद्यतेलासह खाद्यपदार्थांचे प्रमुख निर्यातदार आहेत. दोन्ही देशांना युरोपचं 'ब्रेड बास्केट' म्हटलं जातं. जागतिक बाजारपेठेत होणाऱ्या गहू आणि मक्याच्या पुरवठ्यात युक्रेन आणि रशियाचा अनुक्रमे 29 टक्के आणि 19 टक्के वाटा आहे. युक्रेन हा सूर्यफूल तेलाचा सर्वांत मोठा उत्पादक आहे