राजकोषीय तूट = एकूण खर्च – (महसुली जमा + कर्जेतर भांडवली जमा)
राजकोषीय तूट म्हणजे एकूण उत्पन्नापेक्षा सरकार किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. असा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकारने एका वर्षात घेतलेली एकूण कर्जे म्हणजेच सरकारची राजकोषीय तूट होय.

तुटीचा अर्थ भरणा –
 
१) नवीन चलन निर्मिती
२) RBI कडून कर्ज
३) संचित रोख पैशातून पैसे वापरणे.
 
तुटीचा अर्थसंकल्प भाववाढ घडवून आणणारा असतो. त्यावर योग्य नियंत्रण असणे आवश्यक असते. राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणण्याच्या दृष्टीकोनातून (Fiscal Responsibility And Budget management Act 2003) FRBM कायदा 2003 करण्यात आला.