२२ डिसेंबर, १९५३ रोजी न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे तीन सदस्य न्यायमूर्ती फजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि केएम पणीकर हे होते. या आयोगाने ३० डिसेंबर १९५५ रोजी आपला अहवाल सादर केला.