कलम २४३ पी मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. कलम २४३ क्यु मध्ये तीन प्रकारच्या नगरपालिका स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
१९९२ च्या ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार तीन प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना करण्यात आली. त्या खालीलप्रमाणे आहेत. नगरपालिकांचे वर्गीकरण : लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे अ, ब, क वर्गामध्ये करण्यात येते. नगरपालिकेत किमान १७ ते कमाल ६५ सदस्य असतात.