महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट 12 नोव्हेंबर 2019 रोजी लागू झाली होती. त्यानंतर ती 23 नोव्हेंबर 2019 रोजी मध्यरात्री हटवण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं. पण आवश्यक तो आकडा जमवणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यानंतर दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.