राष्ट्रीय पंचायती राज दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा राष्ट्रीय दिवस आहे जो दरवर्षी 24 एप्रिल रोजी पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 हा पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून घोषित केला. त्यांनी नमूद केले की जर पंचायती राज संस्थांनी योग्यरित्या कार्य केले आणि स्थानिक लोक विकास प्रक्रियेत सहभागी झाले तर माओवाद्यांच्या धोक्याला तोंड देता येईल.