पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील बगदरी गावात 2 ऑक्टोबर 1959 पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था सुरू केली. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 ला राष्ट्रीय पंचायत राज दिनाची घोषणा केली. तेव्हापासून भारतात 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो