आरोग्याविषयीच्या पायाभूत सुविधा एकात्मिक पद्धतीने पुरविणे हे या धोरणाचे अल्पकालीन उद्दिष्ट होते, तर प्रत्येक जोडप्याला दोन मुले - यासाठी प्रोत्साहन देणे, हे मध्यमकालीन उद्दिष्ट्य ठेवण्यात आले. सन २०४५ पर्यंत लोकसंख्येचे स्थिरीकरण करणे, हे या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट्ये होते.