रेषा किरण आणि रेषाखंड म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रेषा ही दोन्ही दिशांना अनंतापर्यंत जाते असे मानतात. जर एका बाजूने बिंदूने मर्यादित असेल, तर तिला अर्ध रेषा किंवा किरण म्हणतात. दोन्ही बाजूंनी बिंदूंनी मर्यादित असेल, तर तिला रेषाखंड म्हणतात. आर्किमिडीज यांच्या मते सरळरेषा म्हणजे दोन बिंदूंमधील सर्वांत लहान लांबीचे अंतर.