कोणतंही रॉकेट आकाशात प्रक्षेपित करताना त्यात अनेक स्टेज वापरल्या जातात. रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. रॉकेट मधील इंधनाच प्रज्वलन होऊन ते इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो.