लिंग गुणोत्तर :
लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.[३] म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.
लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००
काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८
लिंग गुणोत्तर कसे काढतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.