लॅटिन अमेरिका हा अमेरिका (खंड)ातील एक भौगोलिक व सांस्कृतिक प्रदेश आहे. उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका व कॅरिबियनमधील प्रामुख्याने स्पॅनिश, पोर्तुगीज व फ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांचा लॅटिन अमेरिकेत समावेश होतो.