बेरोजगार शेतमजूर जवळपासच्या प्रदेशात, पिकांच्या प्रक्रियांनुसार स्थलांतर करतात त्यास 'हंगामी स्थलांतर'म्हटले जाते उदा., महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात ऊसकापणीच्या हंगामापुरते जवळपासच्या जिल्ह्यांतून येणारे मजूर. एका अप्रगत प्रदेशातून मोठ्या संख्येने प्रगत प्रदेशात स्थलांतर होते त्यास 'सामूहिक स्थलांतर' म्हणतात.