लोकशाहीचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकशाहीचे साक्षात (प्रत्यक्ष) आणि प्रातिनिधिक (अप्रत्यक्ष) लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात 'लोकशाही' हा शब्दप्रयोग सामान्यपणे प्रातिनिधिक लोकशाही या अर्थानेच केला जातो तथापि स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोव देशांतून आजही साक्षात लोकशाहीचा प्रयोग काही प्रमाणात पाहावयास मिळतो. उदारमतवादी लोकशाही ही एक प्रातिनिधिक लोकशाही आहे जी कायद्याच्या नियमाद्वारे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मालमत्तेचे संरक्षण करते. याउलट, एक बचावात्मक लोकशाही लोकशाहीच्या संस्थांचे संरक्षण करण्यासाठी काही अधिकार आणि स्वातंत्र्य मर्यादित करते.