लोकसंख्या वृद्धी, लिंगनिहाय विभागणी, वयोमानानुसार रचना, राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांसारख्या आर्थिक चलांच्या अभ्यासाबाबत लोकसंख्या अभ्यास व अर्थशास्त्र हे आंतरसंबंधित असल्याचे दिसते. भविष्यातील एकूण लोकसंख्या व त्याची गुणवत्ता, आर्थिक संधी आणि आर्थिक संघटन यांवर अवलंबून असते.