वंचितांचा इतिहास म्हणजे काय?

समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला " वंचितांचा इतिहास " असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.


वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून झाली.

३. लोकपरंपरा हे वंचितांचा इतिहास लिहिण्याचे महत्त्वाचे साधन मानण्यात आले आहे.
४. वंचितांच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण विचारसरणीचे स्थान प्राप्त करून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले.
५. गुहा यांच्या आधी महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लेखनातून वंचितांच्या इतिहासाचा विचार मांडला
६. 'गुलामगिरी' या ग्रंथात जोतिबांनी शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडला, तसेच स्त्रियांच्या शोषणाकडेही लक्ष वेधले.
७. डॉ. आंबेडकरांनी दलित वर्गाचाही भारतीय सांस्कृतिक व राजकीय घडणीत मोठा वाटा असल्याचे आपल्या 'हू वेअर द शूद्राज' आणि 'द अनटचेबल्स्' या ग्रंथातून मांडले.