कोणत्याही वारसांमध्ये मालमत्तेबाबत कोणताही वाद नसेल, अशा परिस्थितीत एक वारस दुसर्‍या वारसाला रिलीझ डीड करू शकतो. हक्कसोड पत्रात ही मालमत्ता मला वारसा म्हणून मिळाली असून ती मी दुसऱ्यासाठी सोडत आहे, असा उल्लेख केला जातो. अशा प्रकारच्या रिलीझ डीडमध्ये काही रक्कम दिली जाते किंवा विनामूल्य देखील हक्क सोडला जातो.