वनसंवर्धन म्हणजे काय?

वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे.

जैवविविधतेतील प्रत्येक पशुपक्षी प्राणी जलचर सूक्ष्मजीव हे सर्वजण त्या चक्रातील सारखे घटक आहेत त्यातील एकाही घटकास इजा अथवा धोका पोहोचला तरी हे चक्र सुरळीत गतीने चालणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम मानवांना भोगावे लागतील मोठमोठ्या जंगलांना कधीकधी आग ही लागतात किंवा लावल्या जातात त्यामध्ये हजारो वृक्षांची वनसंपदा औषधी वनस्पती पशुपक्षांचे आश्रयस्थान जैवविविधता जळून खाक होते परत तिथे तशीच जैवविविधता निर्माण होण्यासाठी साधारणता 15 ते 20 पिढ्या अर्थात पाचशे वर्षांचा कालावधी जावा लागतो.

 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे आमच्या संतांनी सांगून ठेवले आहे आमच्या पूर्वजांनी वड, पिंपळ, तुळस ,आंबा, लिंब अशा अनेक ना विविध प्रकारच्या झाडांना महत्व दिले व त्यांचे वृक्षारोपण केले झाडांमुळे पाऊस पडतो पाणी मिळते सावली मिळते बाष्प टिकून राहते ऑक्सिजन मिळतो भूजल पातळी वाढते तापमानात घट होते त्यामुळे वृक्षरोपण किंवा वनसंवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की ऑक्सिजन चे महत्व किती होते ते ऑक्सिजन जर हवा असेल तर आपणा सर्वांना प्रत्येकी एक एक झाड लावणं गरजेचं आहे.

झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय प्राणी जीवन नाही जन्मानंतर व मृत्यूपर्यंत चालणारा श्वास हा आपल्या पृथ्वीतलावर वनस्पती पासून मिळतो सर्व प्राणीमात्रांना जीवन आवश्यक प्राणवायू हे झाड देत असते व आपणास अपयकारक असणारा शेवटू कार्बन डाय-ऑक्साइड हा विशाल वायू स्वतः शोषून घेऊन सर्व प्राणीमात्रांवर ही वृक्ष संपत्ती दया करत आहे परंतु आमच्या प्राण्यांचे रक्षण करणाऱ्या वनदेवतेचा आम्ही सतसहहार करतो आहोत ते सुद्धा प्राथमिक गरजे पोटी नसून अधिकाधिक लालसे पायी मानव जात जगलांचा नाश करत आहे .




वनसंवर्धन व वृक्षारोपण दिनासाठी घोषवाक्य व चारोळ्या :

 वृक्ष संवर्धन दिनाचा दिवस खास वृक्ष रक्षणाच्या घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला देव मोकळा श्वास

 झाडे लावा सृष्टी वाचवा पर्यावरणाचा साधा समतोल लाभेल आरोग्य संपन्नता जीवन आहे अनमोल

भविष्य उद्याचे नव्या पिढीचे संकटात टाकू नका वनांचे करारक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण

 जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका.