कोणत्याही वस्तूंची, घटनांची अगर तत्त्वांची लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्यांमधील साम्य आणि भेदांवर आधारित गटवारी करणे म्हणजे वर्गीकरण होय. व्यापक अर्थाने असे वर्गीकरण करण्याच्या पण अधिक नेमकेपणे वनस्पती व प्राणी यांच्या म्हणजे जीवविज्ञानीय वर्गीकरणाच्या अभ्यासाला वर्गीकरणविज्ञान म्हणतात.