दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद (आफ्रिकान्स: Apartheid) ही दक्षिण आफ्रिका देशामध्ये १९४८ ते १९९४ दरम्यान अस्तित्वात असलेली एक वर्णद्वेषी समाजरचना होती. ह्या पद्धतीनुसार देशामधील काळ्या वर्णाच्या सर्व नागरिकांवर अनेक बंधने घालण्यात आली होती व अल्पसंख्य परंतु सत्तेवर असलेल्या गोऱ्या वर्णाच्या नागरिकांना सर्व अधिकार दिले गेले होते