वर्तनवाद म्हणजे काय?
✅ Updated recently
वर्तनवाद: एक आधुनिक मानसशास्त्रीय संप्रदाय. प्रगतिशील भौतिक शास्त्रांमध्ये मानसशास्त्राचा अंतर्भाव व्हावयास हवा असेल, तर ह्या शास्त्राला विशुद्ध वैज्ञानिक स्वरूप दिले पाहिजे, असे वर्तनवाद मानतो. अंतर्निरीक्षणावर (इंट्रॉस्पेक्शन) आधारलेली मानसशास्त्राची अभ्यासपद्धती ही सदोष आणि अविश्वसनीय आहे.