भाग भांडवल :

कुठलेही व्यापारी प्रतिष्ठान , कंपनी उभारण्यासाठी आर्थिक भांडवल आवश्यक असते. आधुनिक काळात अनेक लोक एकत्र येऊन भांडवल गोळा करतात आणि उद्योग सुरू करतात. प्रत्येकाच्या हिस्स्याला भाग भांडवल असे म्हटले जाते. व्यावहारिक सोयीसाठी ठराविक किंमतिचा एक भाग असतो . प्रत्येक भागधारक आपल्याकडे असणाऱ्या आर्थिक उपलब्धतेनुसार भाग विकत घेतो.प्रत्येक भागधारक हा उद्योगाचा मालक असतो. मालकीचे प्रमाण मात्र त्याच्याकडे असणाऱ्या भागांच्या संख्येवर ठरते. मिळणारा फायदा सर्व भागधारकांमध्ये , भागांच्या मालकीच्या प्रमाणात वाटला जातो.