ज्या वस्तू आपण ग्रॅम, किलोग्रॅममध्ये मोजतो ते त्याचे वजन नसून वस्तुमान आहे. या वस्तुमानावर जेवढे गुरूत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. म्हणजेच एखादया वस्तुला पृथ्वी ज्या गुरूत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात.