आई वडील व कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या वर्तनाचा तसेच घरातील एकुण वातावरणाचा मुलांच्या वर्तनावर फार परिणाम होतो. मुलांच्या योग्य व्यक्तिमत्व विकासासाठी त्याची मातृप्रेमाची गरज योग्य त्या प्रमाणात लहानपणी भागविली जाणे अत्यावश्यक असते.