हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे. अर्थातच यामुळे इतर वातावरणीय थरांपेक्षा या थरात हवेची घनता जास्त असते.