गुणधर्म व वर्तन : कमी घनता, उच्च तरलता (प्रवाहीपणा), दृढतेचा अभाव व उच्च संकोच्यता (दाबले जाण्याचा गुण) ही वायूची गुणवैशिष्ट्ये आहेत. यामुळे वायूला निश्चित आकार वा घनफळ नसते. वायू सहजपणे व झटकन प्रसरण पावतो व ज्या भांड्यात ठेवला असेल त्याचे सर्व घनफळ तो व्यापतो.