पृथ्वीवरील असमान तापमानामुळे हवेचा असमान दाब निर्माण होतो आणि असमान दाबामुळे पृथ्वीपृष्ठावर आणि निरनिराळ्या उंचींवर वारा निर्माण होतो. निरनिराळ्या उंचींवरील वाऱ्याची दिशा व गती समजली म्हणजे वातावरणातील वाऱ्यासंबंधी पूर्ण माहिती मिळते. वारा एक सदिश म्हणजे महत्ता व दिशा असलेली राशी आहे.