विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वयंसेवी संघटना शासनाच्या बहुविध विकासकामांत सहभागी होऊ लागल्या आहेत. समाजात जागृती व्हावी व मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यासाठी या संस्था भाषणे, चर्चासत्रे, पथनाट्ये, साहित्य, महाजालक इ. माध्यमांद्वारे लोकजागृतीची कामे करीत आहेत.