विक्रय कला म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विक्रयकला : (सेल्समनशिप). ग्राहकाने वस्तू अथवा सेवा विकत घ्यावी, यासाठी त्याचे मन वळविण्याची कला म्हणजे विक्रयकला असे सामान्यपणे म्हणता येईल. वस्तू खरेदी करण्याची ग्राहकाची इच्छा अधिक तीव्र करणे व त्याचे हित वस्तू खरेदी करण्यातच सामावलेले आहे हे त्याला मनोमन पटवून देणे, हे या कलेचे उद्दिष्ट असते.