विधिमंडळाचे प्रमुख कार्य म्हणजे विधिनियम किंवा कायदे करणे हे आहे. परंतु त्याचबरोबर आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली असल्याने राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वांगीण नियोजनाचा म्हणजे राज्याच्या सर्वांगीण अर्थव्यवहाराबद्दलचा राज्य विधिमंडळाला विचार करावा लागतो.