आधुनिक विक्रय व्यवस्थापनात विक्रीचे पूर्वानुमान करणे हा सर्वांत महत्त्वाचा भाग मानला जातो. वस्तूच्या विक्रीसंबंधीची भूतकाळातील समग्र माहिती आणि आकडेवारी विचारात घेऊन,वर्तमानकाळातील बदल लक्षात घेऊन आणि भविष्यकाळातील परिस्थितीचे निदान करून आपल्या वस्तूच्या संभाव्य विक्रीसंबंधीचे अंदाज बांधावे लागतात.