विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा परीघ जास्तीत जास्त मोठा असून तो जास्तीत जास्त फुगीर असल्याने उत्तर व दक्षिण ध्रुवांपेक्षा पृथ्वीचा विषुववृत्तीय भाग सूर्याच्या जवळ आहे. सूर्याची किरणे इथे तिरपी न पडता सरळ रेषेत पडतात म्हणून अर्थातच उष्णता जास्त असते.