पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जाते. खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी हे केंद्रस्थान मानून काढलेल्या अनंत व्यासाच्या काल्पनिक खगोलाची संकल्पना आहे. पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल (पातळी) सर्व बाजूंना वाढविल्यास खगोलास ज्या काल्पनिक वर्तुळास छेदते, त्या वर्तुळाला 'खगोलीय विषुववृत्त' असे म्हणतात.