वेदांमध्ये ब्राह्मण हा शब्द नपुंसकलिंगी वापरला असेल, तेव्हा त्याचा अर्थ मन्त्रव्यतिरिक्त वैदिक गद्य वाङ्मय असा होतो. यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले विवेचन, असे ब्राह्मण या शब्दाचे लक्षण होय. ब्रह्म म्हणजे मंत्र वा यज्ञ. मंत्र व यज्ञ यांसंबंधी विवेचन करणारे गद्य वाङ्मय म्हणजे ब्राह्मण.