हे एक संशोधनच आहे. पण सृष्टीतील, मानवी व्यापारापासून स्वतंत्र अशा, घडामोडींचा खुलासा देणारे जे संशोधन असते, त्याला स्थूलमानाने वैज्ञानिक संशोधन असे म्हणतात. सृष्टीतील घटनांचे निरीक्षण आपण करतो. त्या घटनाक्रमात काही घाट किंवा नियमितता आहे, असा होरा आपण बांधतो.