पॉल मझूर यांच्या मते, “विपणन म्हणजे, समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय." ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो. यामुळे ग्राहकांचे राहणीमान उंचावण्यास व चांगले राहण्यास मदत होते.