चुकीचे निर्णय, समन्वयाचा अभाव, प्रयत्नांचा अपुरेपणा अशा कारणांमुळेसुद्धा अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकत नाहीत. अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाद्वारे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते. अशा प्रयत्नांना व्यवसाय-नियंत्रण असे म्हणतात.