व्यवस्थापकीय दिग्दर्शन हे असे क्लिष्ट काम आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांकडून दीर्घ व अल्प कालावधीत कार्यक्षम व परिणामकारक काम करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सर्व कामांचा समावेश असतो. एखाद्या संस्थेमध्ये काम करणारी सर्व माणसे स्थूलमानाने पाहता समान वाटत असली, तरी त्यांच्यामध्ये वास्तविक पाहता समानता नसते.