व्यावसायिक सेवा म्हणजे काय?

ज्या अंतर्गत मेल मजकूर (ड्राफ्ट) तयार करण्यापासून ते पाठवण्यापर्यंत सर्व क्रियांचा समावेश होतो. व्यवसाय पोस्ट ही सेवा छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच मोठ्या संस्था व कंपन्यासाठी उपयुक्त आहे. ग्राहक त्यांना आवश्यक सेवेची निवड करू शकतात, की ज्यामध्ये छपाई, तपासणी इत्यादींचा समावेश होतो.

१) वाहतूक -

उत्तर : (१) वाहतूक म्हणजे व्यक्ती. प्राणी आणि मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यात येणारी ने-आण होय. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते. १९९०-९१ पासून मुक्त अर्थव्यवस्थेमुळे पायाभूत घटकांचा (रस्ते, रेल्वे) जलद गतीने विकास झाला. आज वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब वाहतुकीसाठी केला जातो. जसे, रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतूक, व्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीची गरज असते. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, कालवा मार्ग (पोट मार्ग), नलिका मार्ग आणि यांना जोडणारी स्थानके. जसे, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मोटार थांबे आणि बंदरे. या सर्व स्थानकांचा उपयोग प्रवासी आणि मालाच्या चढ-उतारासाठी केला जातो. (२) वाहतुकीमुळे उत्पादन कार्याला चालना मिळते. कारण ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध आहे तेथून तो उत्पादनाच्या ठिकाणी नेणे शक्य होते. मजुरांची ने-आण होते. वाहतुकीमुळे बाजारपेठेचाही विस्तार होतो. मालाचे वितरण व बाजारपेठ यामध्ये वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते. आंतरराष्ट्रीय पर्यटन व बाजारपेठेचाही विस्तार हवाई वाहतुकीमुळे होतो. वाहतुकीमुळे स्थळ (ठिकाण) उपयोगिता निर्माण होते; कारण ज्या ठिकाणी वस्तू मुबलक आहे, तेथून त्यांची कमतरता जेथे आहे तेथे त्या वाहतुकीद्वारे घेऊन जाणे शक्य होते. तसेच वाहतुकीमुळे ग्राहकांना आवश्यक असलेला माल योग्य वेळी पुरवल्यामुळे मागणी आणि पुरवठा यांमध्ये समतोल साधला जातो व किमती स्थिर राहतात. तसेच वाहतुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात, राहणीमान उंचावते व आर्थिक विकास शक्य होतो.

२) संदेशवहन-

व्यापाराला साहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. संदेशवहन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींची देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एखादया माध्यमाच्या साहाय्याने माहितीचे वहन करण्याची प्रक्रिया म्हणजेच संदेशवहन किंवा संप्रेषण होय. संदेश प्राप्त करणारी व्यक्ती तो संदेश समजून घेऊन त्यानुसार पुढील कार्य करते. पत्र, टेलिफोन, इंटरनेट, मोबाईल, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे, आकाशवाणी इतर छापील माध्यमे इत्यादी संदेशवहनाचे वेगवेगळे प्रकार किंवा माध्यमे आहेत. (२) जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार, “संदेशवहन, ही कल्पना वस्तुस्थिती व कृती यांचे संक्रमण व विनिमय करणारी एक प्रक्रिया आहे” संप्रेषणामुळे व्यावसायिक माहिती अतिशय जलद व सुलभपणे दुसऱ्या व्यावसायिकापर्यंत जाते व त्याचा फायदा व्यापार, उदयोगात होतो. दोन व्यक्ती, संस्था, कंपनीमधील अंतराची समस्या सहजपणे संप्रेषणामुळे दूर होते. परिणामकारक संप्रेषणामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विस्तार होतो व त्याचा फायदा शेती उत्पादने, तसेच औदयोगिक उत्पादने सर्वदूर विकली जातात व देशाच्या विकासाला हातभार लागतो.

३) बँकिंग-

उत्तर : (१) बँक ही संज्ञा फ्रेंच शब्द 'बँको' या शब्दापासून आलेली आहे. बँको म्हणजे 'खंडपीठ' किंवा 'बेंच, टेबल' होय.प्राचीन काळामध्ये सावकार लोक कर्ज देण्या-घेण्याच्या उद्देशाने चलनी नाण्यांचा मोठा ढीग टेबलावर ठेवून देवाण-घेवाणीचे व्यवहार करीत असत. यावरून ही संज्ञा रूढ झाली. बँक म्हणजे असे, संघटक बल जे पैशासंबंधित व्यवहार करीत असते. अशी वित्तीय संस्था जी च्या दुसऱ्यांचे पैसे स्वीकारून सुरक्षित ठेवते व गरजू लोकांना कर्ज स्वरूपात वाटप करते, अशा आर्थिक संस्थेला 'बँक' म्हणतात.(२) बँकिंग व्यवसायामध्ये मागणी करताच परत करण्याच्या अटींवर ठेवी स्वीकारणे व नंतर त्या रकमेतून कर्ज देणे किंवा गुंतवणूक करण्याच्या कार्याचा समावेश होतो. कमी व्याजदराने ठेवी स्वीकारणे व अधिक व्याजदराने कर्ज वाटप करून बँक नफा कमावते. देशाच्या गुण रोख भांडवल वितरणात व संरक्षणात बँक महत्त्वाचे कार्य करते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यक्षम बँकिंगचा मोठा वाटा असतो.

४) विमा-

उत्तर- विशिष्ट फी ज्याला विमा हप्ता म्हणतात, तो आकारून विमा कंपन्या व्यावसायिकांचा धोका स्वतः स्वीकारतात. व्यवसायामध्ये वस्तूच्या उत्पादन पायरीपासून ते वस्तू ग्राहकापर्यंत उपभोगासाठी पोहोचेपर्यंत अनेक धोके संभवत असतात. विमा कंपनी विमा करारावर सही घेऊन व करार करून विमेदाराला एका ठरावीक मुदतीनंतर अथवा एखादया दुर्घटनेच्या वेळी विशिष्ट ठरावीक रक्कम देण्याचे वचन देते. अशा प्रकारे विमा कंपनी व्यावसायिकांना विम्याच्या वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देऊन, व्यावसायिक धोक्यापासून संरक्षण करते व त्यांना त्यांच्या दैनंदिन कारभारावर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य करते.

५) साठवणूक-

उत्तर : (१) गोदामामध्ये मालाचा साठा किंवा संग्रहण करण्यासाठी जी कार्य करावी लागतात, त्या सर्व कार्यांना 'साठवण' म्हणतात. मालाचे संग्रहण करणे हे विपणनाचे एक प्रमुख कार्य आहे. साठवण ही संज्ञा देखील मालाचे संग्रहण करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा मालाचा साठा हा मोठ्या प्रमाणात व विशेष पद्धतीने केला जातो, तेव्हा त्याला ‘साठवणूक’ म्हणतात. ज्या इमारतीत अथवा ठिकाणी मालाची साठवण केली जाते, त्याला ‘गोदाम’ म्हणतात. (२) साठवणुकीमध्ये मालाच्या उत्पादनापासून प्रत्यक्ष वापरापर्यंतचे मालाच्या सुरक्षिततेचे योग्य व्यवस्थापन केले जाते. साठवणूक क्रियेमध्ये मालाचे उष्णता, वारा, पाऊस, आग यांपासून संरक्षण केले जाते. गोदामातून जेव्हा माल साठवला जातो, तेव्हा तेथे मालाच्या प्रतीनुसार वर्गवारी व चिन्ह देण्याचे कार्य उत्पादक, घाऊक व्यापारी करतात. गोदामामुळे किंमत स्थिर राखण्यास मदत होते. तसेच मालाच्या साठवणुकीबरोबरच प्रतवारी, संवेष्टन, मुद्रीकरण ही कार्ये गोदामांत पूर्ण केली जातात.