शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणत: २८ अंशांनी कललेला असल्यामुळे पृथ्वीवरून आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात, काही वेळा पृथ्वी शनीच्या विषुववृत्ताच्या पातळीत येते, त्यावेळी शनीची कडी पृथ्वीवरून दिसेनाशी होतात व फक्त एक बारीक रेषा दिसते. शनीला एकूण सुमारे ६२ चंद्र आहेत.