मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाच्या स्थानिक शासन संस्थेला 'महानगरपालिका म्हणतात. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्यसंख्या निश्चित केली जाते.