शाळा व्यवस्थापन समितीची महिन्यातून किती बैठका होतात?
शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक होतात.
शाळा व्यवस्थापन समिती रचना : (अटी व शर्ती खालीलप्रमाणे)
१) सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील. (सदस्य सचिव वगळून)
२) यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील, पालक यामधून असतील.
अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
ब) उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातीत बालकाच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.
क) पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्यात यावे.
3) उर्वरित 25 टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील -
अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी - एक. (स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील)
ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक - एक.
क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ/ बालविकास तज्ञ - एक.
४) वरील अ.क्र.२ मधील बालकांचे आईवडील/ पालक सदस्यांमधून, सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील.
५) शाळेचे मुख्याध्यापक/ प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
६) या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील.
शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये :
(अधिनियमातील कलम-२२ नुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.)
१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
२) आर्थिक वर्ष संपण्याच्या किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट 'अ' प्रमाणे)
३) शाळेस शासनाकडून, स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील याची दक्षता घेणे.
८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनाचे संनियंत्रण करणे.
९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
११) शाळेतीत मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे.
१२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
१३) शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१५) निरुपयोगी साहित्य रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.
१८) समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या :
- शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
- शाळा शिक्षण हक्क कायदयाशी अनुरूप करणे.
- शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
- गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
- शालेय पोषण आहार योजना व इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
- शालेय मंत्रिमंडळ/ बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
- शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
- शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
- शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसन करून शाळेचा विकास करणे.
- शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
- महिन्यातून किमान एक बैठक घेणे. बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.
- आपले ध्येय (१००% पटनोंदणी १००% उपस्थिती.)
शाळा व्यवस्थापन समितीसाठी मार्गदर्शक सूचना :
1) शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करावी.
2) शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावे फलकावर लावण्यात यावी.
3) शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षकांनी एमेकांनांचा आदर करावा.
4) समिती सदस्य व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.
5) शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा. त्यात पारदर्शकता असावी.
6) शाळेच्या विकासास साहाय्यभूत ठरेल असा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात यावी.
7) बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
8) उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य/ मुख्याध्यापक/ शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा.
9) विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच शाळेस शासनाकडून मिळणाऱ्या निधीची माहिती अद्ययावत करून शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावी.
शाळा व्यवस्थापन समितीची महिन्यातून किती बैठका होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.