नफा मिळविणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे खाजगीकरणात शिक्षणाला केवळ एक 'क्रय वस्तू' मानले जाऊन विद्यार्थ्यांकडे 'ग्राहक' या नात्याने पहिले जाते. त्यामुळे विद्यार्थी ग्राहक आणि खाजगी सेवा पुरविणाऱ्या शिक्षणसंस्था रचनेत आज उच्च शिक्षण एक उद्योगधंदा म्हणून उभा राहिला आहे.