शीतयुद्ध : प्रत्यक्ष युद्ध टाळून धमक्या, जहाल प्रचार, छुप्या विध्वंसक कारवाया इत्यादींचा अवलंब करणारा मूलतः अमेरिका व सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांमधील राजकीय संघर्ष किंवा शत्रुत्व. दुसऱ्या महायुद्धोत्तर जगाची राजकीय आणि आर्थिक पुनर्रचना करण्याच्या प्रश्नावर शीतयुद्धाची सुरुवात झाली.