शेअर बाजारात तुम्ही थेट गुंतवणूक करता म्हणजे काही कंपन्यांचे शेअर विकत घेता. तुम्ही विकत घेतलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर तुम्हाला थेट याचा फायदा मिळतो. पण, काही वेळा शेअरची किंमत कमी होऊन तुम्हाला काही दिवसांतच मोठा तोटाही होऊ शकतो. मुदत ठेव, पोस्टातली गुंतवणूक यांच्या तुलनेत शेअर बाजारात चढ-उताराची जोखीम आहे.