गुणवत्ता ही व्यक्तिनिहाय व कला कौशल्यनिहाय असते. आपल्या पाल्याने सर्वच विषयांत आणि सर्व प्रकारे गुणवान व्हावे, ही अपेक्षा पालकांनी ठेवणे चुकीचे आहे. प्रत्येक मुलाची विविध जीवनकौशल्य संदर्भातील गती, मती व आवड वेगवेगळीच असू शकते, हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. आनंददायी शिक्षण या संकल्पनेतील प्रमुख अडथळा पालकच असतात.