श्रमिक संघसत्तावाद : ( सिंडिकॅलिझम ). समाजवादी पुनर्रचना हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक कांतीसाठी प्रयत्न करणारी कांतिकारक तत्त्वप्रणाली. कांतिकारी व अराज्यवादी मूलघटक असलेली, ती श्रमिकवर्गाची भांडवलदारविरोधी चळवळ वा मतप्रणाली होय.