संगणकीय लेखांकन प्रणाली म्हणजेच अश्याप्रकारची आज्ञावली ज्यामुळे आपण विविध उपयुक्त माहिती ही लेखांकन प्रणालीमध्ये साठवू शकतो. ही प्रणाली संगणक, संगणक महाजाल तसेच अनेक दूरस्थ संगणकीय उपकरणे यांच्या द्वारेजोडलेली असते. संगणकीय लेखांकन प्रणाली द्वारे व्यवसायात विविध प्रकारचे उपयुक्त अहवाल व विवरणपत्रे बनवली जातात.