शासनाच्या दोन घटनात्मक पातळ्या अधिकार वाटप, लिखित संविधान, स्वतंत्र न्यायमंडळ, द्विगृही कायदेमंडळ हि संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत. एस. आर. बोम्माई खटल्यात (१९९४) सर्वोच्च न्यायालयाने घटना संघात्मक असल्याचे स्पष्ट सांगितले, तसेच संघराज्यवाद (Federalism) हे घटनेचे 'मुलभूत वैशिष्ट्य' असल्याचे सांगितले.