संवेदन या शब्दाचा अर्थ काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संवेदन : (पर्सेप्शन). बोधात्मक अनुभवाच्या संदर्भात संवेदन ही ð वेदना नंतर येणारी प्रक्रिया आहे. वेदनाच्या प्रक्रियेत डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ ह्या पाच ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला एखादया उद्दीपकाची जाणीव होते तथापि ही बोधात्मक अनुभवातील प्रारंभिक वा मूलभूत अवस्था होय.